मी प्रसाद शेंडगे,
शाळेमध्ये असल्यापासून मला वाचनाचं खूप वेड होतं..शाळे मध्ये असताना कथा , कादंबऱ्या वाचनाची गोडी लागली आणि तिथूनच मला वाटतं माझ्या वरती शब्दसंस्कार होण्यास सुरुवात झाली...शाळा सुटली की वृत्तपत्र वाचनालयात जाऊन सर्व वृत्तपत्र वाचून काढायचो त्यामुळे माझी शब्दसंपत्ती वाढत गेली आणि हळू हळू लिहण्यास सुरुवात केली आणि कवितेच माध्यम निवडलं.
मला कविता सूचत जात होत्या आणि त्या कागदावर लिहत जात होतो...खरचं मी कवितेत अगदी रमून जातो, जेव्हा एखादी कविता जन्माला येते ना,तेव्हा होणारा आनंद हा अवर्णनीय असतो...आणि म्हणूनच कविता ही माझ्या आता जगण्याचा एक महत्वाचा भाग होऊन बसली आहे...''जगण्याचा श्वास'' जरी बोललो तरी वावगं ठरणार नाही....
कोणीतरी मला विचारले की तुला कविता सुचतात तरी कशा रे ??? तर त्याला मी कवितेतच उत्तर दिलं..
मनात जेव्हा वाहत असते,
शब्दांची सरिता...
तशीच येते जन्माला मग पुन्हा नवी कविता....
©प्रसाद..✍
No comments:
Post a Comment