बाबा तुझं नाव लावताना वाटतो मला गर्व,
तुझ्याच अवती भवती आहे जीवन सर्व
म्हणतोस जेव्हा बाबा माझी लेक माझा स्वाभिमान,
तेव्हा मात्र आपसूकच ताट होते मान.
घोडागाडी करत मी दुखवली तुझी पाठ,
घोडेस्वार होऊन मिरवला माझा थाट
आमचा सुखासाठी किती करशील कष्ट,
घे आता आराम आणि जीवन जग मस्त
तुझा डोळ्यात बाबा कधी पाणी नाही आणणार,
म्हणून तुला लग्नात रुखवत म्हणून न्हेणार
तुझा त्रास बाबा एक लेकच समजू शकते,
कितीही नाही बोललास तरी तुला मीच समजू शकते
माझी काळजी बाबा किती रे तू करणार,
लेक झाली मोठी हे कधी रे तुला कळणार
झाले किती मोठी, झाले जरी नवरी,
ओळख माझी कायम राहील, "बाबाची मी गौरी....."
- By Gouri Gandhi
If you want to use any Pictures/Poems/Stories from our collection for your Website, Blog, Magazine or any other stuff feel free to contact any of us here